महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Indian Idol Marathi : ‘जिवलगा’ गात ‘इंडियन आयडल मराठी' मध्ये भाग्यश्री टिकलेचा 'झिंगाट परफॉर्मन्स' - इंडियन आयडल मराठी

‘इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) ची स्पर्धक भाग्यश्री टिकलेला गेले अनेक आठवडे परीक्षांकडून विशेष असं कौतुक मिळालं नव्हतं. पण यंदाच्या आठवड्यात मात्र भाग्यश्रीने 'हम भी कुछ कम नही' हे दाखवत दमदार सादरीकरण करून प्रेक्षकांच्या कौतुकावर स्वतःचं नाव कोरलं.

bhagyashree tikle
भाग्यश्री टिकले

By

Published : Feb 1, 2022, 1:37 PM IST

मुंबई - म्युझिक रियालिटी शोमध्ये स्वतःच्या आवडीचं गाणं निवडून ते सादर करणं तसं सोप्प असतं. ‘इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) मधूनही याला पुष्टी मिळाली. पण जेव्हा परीक्षक गाणं देतात, तेव्हा त्या गाण्याला पूर्णपणे न्याय देणं, परीक्षकांच्या अपेक्षांना खरं उतरणं हे जबाबदारीचं काम असतं. या आठवड्यात स्पर्धकांची खरी परीक्षा होती. कारण स्पर्धकांना गायचं होतं परीक्षकांच्या आवडीचं गाणं! हे आव्हान सगळ्या स्पर्धकांनी अगदी चोख उचललं.

भाग्यश्री टिकले
‘इंडियन आयडल मराठी' ची स्पर्धक भाग्यश्री टिकलेला गेले अनेक आठवडे परीक्षांकडून विशेष असं कौतुक मिळालं नव्हतं. पण यंदाच्या आठवड्यात मात्र भाग्यश्रीने 'हम भी कुछ कम नही' हे दाखवत दमदार सादरीकरण करून प्रेक्षकांच्या कौतुकावर स्वतःचं नाव कोरलं. भाग्यश्री टिकले हिला परीक्षकांनी 'जिवलगा' हे अतिशय अवघड गाणं दिलं होत आणि या गाण्याला तिनी पुरेपूर न्याय देऊन 'झिंगाट परफॉर्मन्स' मिळवलं आहे. भाग्यश्री आता हा मिळालेला सूर असाच जपणार हे नक्की.

भाग्यश्रीचा 'झिंगाट परफॉर्मन्स'

सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. 'इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे.
हेही वाचा -Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha : पोस्को न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची मागणी; सुनावणी 7 फेब्रुवारीला

ABOUT THE AUTHOR

...view details