महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘हास्यजत्रे’चे पडद्यामागील ‘सचिन आणि सचिन’ हसविण्यासाठी स्वतः अवतरणार सर्वांसमोर!

हास्यजत्रेचे पडद्यामागील हास्यजादूगार सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी ही लेखक-दिग्दर्शकाची जोडी गेला एक दशकभर प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. पहिल्यांदाच ही जोडी हास्यजत्रामध्ये प्रहसन सादर करणार आहेत.

Sachin and Sachin'
सचिन आणि सचिन’

By

Published : Feb 2, 2021, 2:28 PM IST

मुंबई- नजीकच्या काळात टेलिव्हिजनवर विनोदी कार्यक्रमांनी जोर धरलाय व त्यामुळेच प्रत्येक मराठी वाहिनी एक तरी ‘स्टॅन्ड-अप’ कॉमेडी कार्यक्रम दाखवताना दिसतेय. गेल्या वर्षी तर सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने रेकॉर्ड-ब्रेक प्रसिद्धी मिळविली. लॉकडाऊनमुळे आलेल्या नैराश्यावर मात करण्यासाठी या व अशा कार्यक्रमांचा उपयोग झाला. महत्वाचं म्हणजे हास्यजत्रा कार्यक्रमाने लोकप्रियतेची चढती बाजूच पकडली आहे. त्याच्यामागे दोन खंदे ‘खंबे’ आहेत ते म्हणजे, सचिन गोस्वामी व सचिन मोटे. त्यांना हास्यजत्रेचे पडद्यामागील हास्यजादूगार म्हटले जाते. सोनी मराठीसाठी या जोडीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची निर्मिती केली आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाला.

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेली दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हास्यजत्राने प्रेक्षकांच्याही मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. या सर्व स्किट्स मागे अनेकांची मेहनत आणि कष्ट असतात. लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ असे अनेक लोक या मागे मेहनत घेत असतात. स्किट्सच्या माध्यमातून कलाकार बऱ्याचदा त्यांचा उल्लेख देखील करतात. अशीच दोन नाव म्हणजे हास्यजत्रेचे पडद्यामागील हास्यजादूगार सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी ही लेखक-दिग्दर्शकाची जोडी गेला एक दशकभर प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.

येत्या आठवड्यात पडद्यामागील हे हास्यजादूगार सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी मंचावर एक स्किट सादर करणार आहेत. आता नेहमी पडद्यामागे असणारे व पडद्यासमोरील कलाकारांच्या डोळ्यात अंजन घालणारे जेव्हा सर्वांसमोर स्किट सादर करतील तेव्हा काय गमती जमती होणार आहेत ते कार्यक्रम बघितल्यावरच कळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details