मुंबई -अभिनेत्री दिशा पाटणीवर चित्रीत झालेलं 'बागी ३'चं नवं गाणं 'डू यू लव्ह मी' हे अलिकडेच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात दिशाचा सिझलिंग डान्स मुव्ह्ज पाहायला मिळतात. तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. मात्र, या गाण्यावर चोरीचा आरोप झाल्याने या गाण्याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.
होय, 'डू यू लव्ह मी' या गाण्याच्या डान्स मुव्ह्ज पासून ते पोस्टरपर्यंत हे गाणं कॉपी असल्याचं म्हटलं गेलं आहे. सुप्रसिद्ध कंपोजर आणि लेखक रेने बेनेडली यांचे हे गाणे असल्याने 'बागी ३'च्या गाण्याने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -दिशा पाटणीचा आत्तापर्यंतचा सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस डान्स, पाहा 'बागी ३'चं गाणं