मुंबई - लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाचे कामकाज ठप्प झालंय. लोक आपल्या घरी थांबून स्वतः चा बचाव करीत आहेत. मिळालेला हा वेळ कसा कारणी लावायचा याबद्दल जाणताना बॉलिवूड सेलेब्रिटी काय करताहेत हे जाणून घेऊयात.
याकाळात टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल मृणाल ठाकूर हिने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिलंय, ''चला एक चांगली बाजू पाहूयात. वेळ कमी असल्यामुळे ज्या गोष्टी आपण करू शकत नव्हतो उदा. त्वचेची देखभाल आता करू शकतो. मी माझ्या त्वचेची निगा खूप दिवसापासून ठेवली नव्हती. जी मी आत्ता चांगल्या प्रकारे करीत आहे.''
हृतिक रोशनने शनिवारी प्रसारित होणाऱ्या एका अवॉर्ड शोसाठीची एक क्लिप शेअर केली आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''काय मस्करी आहे. काही रिहर्सल नाही. व्हायरसपासून खतरा.''
हृतिक रोशनची एक्स वाईफ लॉकडाऊनच्या काळात घरी परतली आहे. मुलांसाठी ती हृतिकच्या घरी काही काळासाठी राहायला आली आहे. सुझानने त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. तो सध्या घरी कसा वेळ घालवतोय हे सांगण्याचा प्रयत्न तिने या फोटोतून केलाय. यी फोटोत घरातून जुहू बीचचा व्ह्यू दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सुझानने लिहिलंय, ''आणि दुसरी ब्रेकिंग न्यूज...आयुष्यात पहिल्यांदाच कबुतरांचे संमेलन काल चांगल्या प्रकारे पार पडले.''
विराट कोहली आणि अनुष्का हे कपल नेहमीच चर्चेत असते. अनुष्कानं एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात ती पती विराटची हेअरस्टायलिश बनली आहे. अनुष्का विराटचे केस कापताना पाहायला मिळत आहे. विराट क्वारंटाईनमध्ये तुम्हाला काय करावे लागते बघा, असे म्हणतो. यावर अनुष्का स्वयंपाकघरातल्या कात्रीने केस कापणे, या अशा गोष्टी आवडतात, असे उत्तर देते. अखेर शरणागती पत्करत विराट शेवटी माझ्या बायकोने सुंदर केस कापले आहेत, असेही म्हणतो.
यांच्या शिवाय अनेक कलाकार घरी थांबून आहेत. काहीजण घरी मदत करीत आहेत तर काही वाचण्यात, संगीत ऐकण्यात, सिनेमा पाहण्यात व्यग्र आहेत. काहीजण घराची आणि बागेची साफसफाई करताना दिसत आहेत. एकंदरीतच हा स्कीचा लॉकडाऊन कामात आणण्याचा प्रत्न सर्वजण कराताना दिसत आहेत.