महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आयुष्मान खुरानालाही 'कबिर सिंग'च्या गाण्याची क्रेझ, जीममध्ये गायलं गाणं - bekhayali

आयुष्मानचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो जीममध्ये 'कबिर सिंग'चे 'बेखयाली' गाणं गाताना दिसतो. त्याचा हा व्हिडिओ काही मिनिटांमध्येच व्हायरल झाला आहे.

आयुष्मान खुरानालाही 'कबिर सिंग'च्या गाण्याची क्रेझ, जीममध्ये गायलं गाणं

By

Published : Jul 14, 2019, 8:28 PM IST

मुंबई -शाहिद कपूरच्या 'कबिर सिंग'ने तीन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य गाजवले आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईत वाढ होत चालली आहे. चित्रपटाच्या टीजरपासून ते गाण्यांपर्यंत प्रेक्षकांनी या चित्रपटाला तुफान प्रतिसाद दिला आहे. तरुणाईवर 'कबिर सिंग'ची चांगलीच भूरळ पडल्याचे सध्या चित्र आहे. अभिनेता आयुष्मान खुरानालाही 'कबिर सिंग'च्या गाण्याची भूरळ पडली आहे.

आयुष्मानचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो जीममध्ये 'कबिर सिंग'चे 'बेखयाली' गाणं गाताना दिसतो. त्याचा हा व्हिडिओ काही मिनिटांमध्येच व्हायरल झाला आहे.

'कबिर सिंग'नंतर आयुष्मानचा 'आर्टिकल १५' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
आयुष्मान अभिनयासोबत गायनातही अग्रेसर आहे. त्याने त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये एकतरी गाणे गायले आहे. त्याचे सर्व गाणे हिटदेखील झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details