मुंबई - पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूआईसीई) ने घेतला असल्याचे अशोक पंडित यांनी सांगितले. काश्मिरमध्ये पुलवामा येथे झालेल्या जवानांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.
'पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणाऱ्यांवर सिने फेडरेशनची बंदी' - काश्मीर
पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणाऱ्यां निर्मात्यांवर बंदी घालण्याचा निर्णय सिने फेडरेशनने घेतला आहे. पुलवामा येथे झालेल्या जवानांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झालाय. सिने आणि टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्या २४ संघटनांनी काल रॅलीचे आयोजन केले होते.
पंडित म्हणाले, "पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा दाखवणाऱ्या निर्मात्यांवर बंदी घालण्याचा निर्णय एफडब्ल्यूआईसीईने घेतला आहे. आम्ही याची अधिकृत घोषणा करीत आहेत. सीमेपलीकडून सतत हल्ले होत असताना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणाऱ्या संगीत कंपन्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांना लाज नसेल तर आम्हाला त्यांना बाजूला हटवावे लागेल."
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केल्यानंतर बॉलिवूडने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करायचे नाही असे ठरवले होते. परंतु सिने उद्योगातील लोक आपल्या वचनावर टिकून राहात नाहीत. १४ फेब्रुवारीरोजी अशोक पंडित जम्मूमध्ये होते. तेथील दृष्ये पाहून ते व्यथीत झाले आहेत. एफडब्ल्यूआईसीई आणि टीवी उद्योगात कार्यरत असलेल्या २४ संघटनांनी रविवारी एक रॅली काढली. वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण असल्याचे या संघटनांनी दाखवून दिले.