अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या एका वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद तर मिळत आहेच पण प्रेक्षक आसावरी या व्यक्तिरेखेला देखील खूप पसंत करत आहे.
'अगगोबाई सासूबाई' मधील सासूबाईंना मिळाली आशा भोसले यांची दाद - Aggobai Sasubai
'अगगोबाई सासूबाई' मधील आसावरीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी कौतुकाची थाप दिली आणि त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली.
आई, सून, सासू हि प्रत्येक भूमिका चोख बजावणारी आसावरी ही महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनली. आसावरीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी कौतुकाची थाप दिली आणि त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली.
इतकंच नव्हे तर "छान अभिनय करतेस तू. मी तुझी सीरिअल रोज पाहते." असं देखील आशा ताई म्हणाल्या. आशा ताईंनी केलेल्या कौतुकामुळे निवेदिता सराफ भारावून गेल्या. सासूबाईंना चक्क दिग्गज गायिकेकडून त्यांच्या कामाची पोचपावती मिळाली. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. सासूबाई प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत असं म्हंटल तरी खोटं ठरणार नाही