मुंबई - झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेला आणि त्यातील व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली आहे. प्रेक्षकांनी त्यातील इंद्रा आणि दिपू च्या व्यक्तिरेखांना आपलेसे करून टाकले आहे. महत्वाचे म्हणजे या मालिकेतील अजून एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप भावतेय आणि ती म्हणजे देशपांडे सरांची. ती भूमिका साकारली आहे जेष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी.
अरुण नलावडे हे नाटकं, मालिका आणि चित्रपट या सर्व माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांचा करारी आणि आपल्या तत्वांवर ठाम असणाऱ्या देशपांडे सरांची भूमिका प्रेक्षकांना आपलीशी वाटतेय. त्यांचा सहजसुंदर अभिनय सर्वांनाच भावतोय. ‘मन उडू उडू झालं’ मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. या मालिकेतील प्रसिद्ध व्यक्तिरेखांमधील एक व्यक्तिरेखा म्हणजे देशपांडे सरांची व्यक्तिरेखा. अरुण नलावडे यांनी साकारलेला बाबा हा प्रेक्षकांना आपल्यातील एक वाटतो.
Man Udu Udu Zala : ‘मन उडू उडू झालं’ मधील बाबा प्रेक्षकांना आवडत आहेत - अरुण नलावडे - अरुण नलावडे
‘मन उडू उडू झालं’ मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. या मालिकेतील प्रसिद्ध व्यक्तिरेखांमधील एक व्यक्तिरेखा म्हणजे देशपांडे सरांची व्यक्तिरेखा. अरुण नलावडे यांनी साकारलेला बाबा हा प्रेक्षकांना आपल्यातील एक वाटतो.
दिपू इंद्रा यांची जोडी प्रेक्षकांना भावते
‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील दिपू-इंद्रा ही प्रमुख जोडी तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेच आहे पण त्याचसोबत मालिकेतील काही व्यक्तिरेखांचा अभिनय हा हृदयस्पर्शी आहे. दिपूचे बाबा म्हणजेच देशपांडे सर यांची भूमिका मनाला भिडते. त्यांच्या या हृदयस्पर्शी भूमिकेबद्दल बोलताना अरुण नलावडे म्हणाले, "खऱ्या आयुष्यात मलाही मुलगीच आहे. त्यामुळे मुलीचे वडील या आनंदाचा आणि जबाबदारीचा मला अनुभव आहे. मुलगा मुलगी असा भेद न करणाऱ्या देशपांडे सरांची भूमिका मी मन उडू उडू झालं या मालिकेत साकारतोय. संस्कार करताना कठोर, तर मुलींसाठी हळवा असा वास्तववादी बाबा मी यात साकारतोय. सगळं गोड गोड किंवा फक्त नकारात्मक असं न दाखवता परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भावनांतून व्यक्त होणारे बाबा असल्यामुळे प्रेक्षकांना ते आपल्यातलेच एक वाटतात."
हेही वाचा -Mulgi Zali Ho Controversy : किरण मानेंची ५ कोटीची नुकसान भरपाईची मागणी!