अभिनेता आरोह वेलणकरने वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात २० जुलैला दणक्यात प्रवेश केला. कमी वेळातच आरोहने सगळ्यांची मने जिंकत टॉप ६ मध्ये बाजी मारली. आरोह वेलणकरचा स्पष्टवक्ता स्वभाव आणि बुद्धीचातुर्य वापरून खेळायची वृत्ती यामुळे अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांची वाहवाही मिळवली. आरोहने टॉप ६ मध्ये एन्ट्री केल्यापासून सध्या सोशल मिडीयावरून त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
आरोह वेलणकरच्या सोशल मिडीयावर चाहत्यांनी अगदी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या काही प्रातिनिधीक प्रतिक्रिया :
“आरोह तू माझा सर्वात आवडता स्पर्धक आहेस. मी तुझा खूप मोठा चाहता आहेस. मला तुझ्या हातात बिग बॉसची ट्रॉफी पाहायची आहे. तू एक स्ट्राँग कंटेस्टंट आहेस. तू बिग बॉसच्या घरातला सर्वाधिक समजूतदार आणि सरळमार्गी कंटेस्टंट आहेस”
“आरोह तू बिग बॉसच्या घरात सर्वात चांगला खेळाडू आहेस. शिस्तबध्द खेळाडू आहेस. तू सुरूवातीपासून असतास तर तूच विनर झाला असतास. तू खूप हुशार आहेस. तू जसा खेळतो आहेस. त्यामूळे मला तूझा बिग ब़ॉसमधला परफॉर्मन्स खूप आवडतो आहे. “
“आरोह तू स्पर्धक म्हणून माझा फेवरेट आहेस. तुझा स्पष्टवक्तेपणा मला आवडतो. टास्कमध्ये सुध्दा तू खूप छान खेळतोस. माझ्यासाठी तूच बिग बॉसचा विनर आहेस.”
“कुणाशी भांडण नाही ना तंट नाही. जिथे कुठे चुकलास, तिथे एकदम चांगल्या प्रकारे माफी मागितलीस. टास्कसगळेच एकदम मन लावून खेळलास. जरी बिग बॉस जिंकला नाही तरी काही हरकत नाही. कारण तू जनतेचं मन जिंकलंस.”