मेलबर्न - बॉलिवूडमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे नाते आता चांगलेच बहरू लागले आहे. कोणत्याही कार्यक्रमात दोघेही एकमेकांसोबत पाहायला मिळतात. मात्र, मलायकासाठी अर्जुनचा असलेला पसेसिव्हनेस पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे.
अलिकडेच मलायका आणि अर्जुनने मेलबर्न येथील 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात टीव्ही अभिनेता करण ठक्कर हा सुत्रसंचलन करत होता. दरम्यान तो मलायकाजवळ येऊन तिच्यासोबत फ्लर्ट करत होता. '२० तासाच्या प्रवासानंतरही तू किती सुंदर दिसतेय. अर्जुन खूप नशिबवान आहे, की तो तुझ्या शेजारी बसला आहे'. असे त्याने मलायकाला म्हटल्यावर मलायकानेही लाजुन दाद दिली.