मुंबई - नेहमी मलायका अरोरासोबत डेटींगवर जाणाऱ्या अर्जुन कपूरने आपल्या पहिल्या ब्लाईंड डेटचा अनुभव सांगितला आहे.
नेटफ्लिक्सवर 'व्हॉट द लव्ह! विथ करण जोहर' हा शो सुरू होत आहे. निर्माता करण जोहर याचा होस्ट म्हणून काम पाहत आहे. सिंगल लोकांना प्रेमाचा मार्ग दाखवणे आणि खऱ्या प्रेमाची अनुभती देणे हा या शोचा उद्देश आहे.
करणने अलिकडेच अर्जुन कपूरसोबत शोमधील स्पर्धक आशी हिला ब्लाईंड प्रेप (प्रॅक्टीस) वर पाठवले होते.
आशी आणि अर्जुनने आरामात गप्पा मारत डेटचा आनंद घेतला. दोघांनी पिझ्झा खात भरपूर गप्पा मारल्या. अर्जुनने आशीला कोणत्या प्रकारची मुले आवडतात हे विचारले. इतकेच नाही तर तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्नही केला.
आपल्या पहिल्या ब्लाईंड डेटबद्दल बोलताना अर्जुन म्हणाला, ''माझी पहिलीच ब्लाईंड डेट होती. त्यामुळे मला मजा आली. आशी मजेशीर मुलगी आहे. ती फिल्मी आहे आणि थोडी बुध्दूही. तिचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. मला भरपूर मजा आली. सजवून ठेवण्यासारखी ही चांगली आठवण आहे.''
अर्जुन कपूर अलिकडेच आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानिपत' चित्रपटात झळकला होता. तो दिबाकर बॅनर्जी याच्या 'संदीप और पिंकी फरार' या आगामी चित्रटात काम करीत आहे.याशिवाय त्याच्याकडे अजून एक चित्रपट हातात आहे.