मुंबई - अभिनेता अर्जुन बिजलानीने स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी'चा अकरावा सीझन जिंकला आहे. त्याने दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी, वरुण सूद, विशाल आदित्य सिंग आणि राहुल वैद्य यांचा पराभव करून विजेतेपदाचा करंडक जिंकला.
'खतरों के खिलाडी 11' चे संपूर्ण शूटिंग काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाले होते आणि मंगळवारी त्याचा शेवटचा भाग मुंबईत चित्रीत करण्यात आला. यात अर्जुनला विजेता म्हणून घोषित करण्यात आले.
अंतिम भाग 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर रोजी कलर्स टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे. चॅनलने अद्याप विजेत्याचा तपशील जाहीर केला नसला तरी, अर्जुनची पत्नी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनंदन संदेशांचा वर्षाव केला आहे.