मुंबई - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 चा बिगुल वाजला आहे. राज्यात १० फेब्रुवारीपासून निवडणूक होत आहे. या संदर्भात काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी ( Congress National General Secretary Priyanka Gandhi ) यांनी गुरुवारी 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी काँग्रेसने यूपी निवडणुकीत ४० टक्के महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे. या यादीत अभिनेत्री अर्चना गौतमच्या ( Archana Gautam ) नावाचाही समावेश आहे. मेरठच्या हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून ( Hastinapur Assembly constituency ) काँग्रेसने अर्चनाला तिकीट दिले आहे. चला जाणून घेऊया कोण आहे 'बिकिनी गर्ल' ( Bikini Girl Archana Gautam ) अर्चना गौतम?
मेरठ (यूपी) येथे राहणारी 26 वर्षीय अर्चना गौतम 'मिस उत्तर प्रदेश' (2014) झाली आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. अर्चना एक अभिनेत्री, मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धा विजेती आहे.
'मिस उत्तर प्रदेश'चा किताब पटकावल्यानंतर अर्चनाने 'मिस बिकिनी इंडिया', 'मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया' आणि 'मिस बिकिनी युनिव्हर्स' स्पर्धांमध्ये झेंडा रोवला होता.
अर्चनाने 2018 साली 'मिस कॉसमॉस वर्ल्ड कॉम्पिटिशन'मध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अर्चना गौतमला 2018 मध्ये डॉ. एस. राधाकृष्णन मेमोरियल अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे.
2018 मध्येच, तिला मनोरंजनाच्या जगात दिलेल्या योगदानाबद्दल GRT अवॉर्ड द्वारे वुमन अचिव्हर अवॉर्ड देण्यात आला. अर्चनाने मोस्ट टॅलेंट 2018 चा खिताबही जिंकला आहे.