महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अलिबागच्या अपूर्वा ठाकुरने जागतिक सौंदर्य स्पर्धेत पटकावला तीसरा क्रमांक - मिस टीन युनिव्हर्स २०१९'

अमेरिकेमध्ये झालेल्या या स्पर्धेत २८ वेगवेगळया देशांतील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यात अर्जेंटिना, अमेरिका, मेक्सिको आणि कोलंबिया सारख्या देशांचा समावेश होता.

Breaking News

By

Published : Mar 31, 2019, 8:57 PM IST


रायगड - अमेरिकेतील पनामामध्ये आयोजित 'मिस टीन युनिव्हर्स २०१९' या सौंदर्य स्पर्धेमध्ये अलिबागच्या अपूर्वा ठाकूरने तीसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेच प्रथम क्रमांक ब्राझील, व्दितीय मेक्सीको तर तीसऱ्या क्रमांकांवर भारताचे नाव कोरले गेले आहे.

अमेरिकेमध्ये झालेल्या या स्पर्धेत २८ वेगवेगळया देशांतील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यात अर्जेंटिना, अमेरिका, मेक्सिको आणि कोलंबिया सारख्या देशांचा समावेश होता. या २८ स्पर्धकांपैकी १६ स्पर्धकांची निवड अंतिम पुरस्कारसाठी करण्यात आली. त्यामधुन नंतर ६ स्पर्धकांची निवड करण्यात आली. अपूर्वा ठाकूर ही दोन्ही विभागामधून अंतिम सहा जणांमध्ये निवडली गेली. सहा स्पर्धकांमध्ये झालेल्या चुरशीच्या फेऱ्यांमध्ये ब्राझीलच्या सौंदर्यवतीने 'मिस टीन युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धा २०१९' चा मुकूट जिंकला. दुसऱ्या क्रमांकावर मेक्सीकोच्या सौंदर्यवतीची निवड झाली, तर तिसऱ्या क्रमांकावर भारताच्या अपूर्वा प्रविण ठाकूर हिची निवड करण्यात आली.

अलिबागच्या अपूर्वा ठाकुरने जागतिक सौंदर्य स्पर्धेत पटकावला तीसरा क्रमांक


अपूर्वाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळाला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अपूर्वाने २०१८ चा 'मिस टीन इंडिया युनीव्हर्सचा' किताब जिंकला होता. अपूर्वा याबाबत प्रतिक्रीया देताना म्हणाली, की 'मिस टीन युनीव्हर्स' या जागतिक व्यासपीठावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले, ही भाग्याची गोष्ट होती. सर्व भारतीयांच्याशुभेच्छा माझ्या पाठीशी असल्याने मी या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळविला आहे. यावेळी तिने तिचे प्रशिक्षक जसमीत कौर, ठाकूर कुटूंबीय यांच्यासह सर्व रायगडकरांचेही आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details