महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत राणी चेन्नम्माच्या भूमिकेत अपूर्वा नेमळेकर! - राणी चेनम्मा अपूर्वा नेमळेकर

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेनंतर आता अपूर्वा (Apoorva Nemlekar) सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत राणी चेन्नम्माच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेत स्वराज्य राखून ते वृद्धिंगत करण्याचा महाराणी ताराराणी यांचा प्रवास प्रेक्षकांना भारावून टाकणारा आहे.

apoorva nemlekar
apoorva nemlekar

By

Published : Jan 22, 2022, 10:42 AM IST

मुंबई -चित्रपट, नाटकं आणि मालिकांमधून कामं करणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेने अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. आता अपूर्वा (Apoorva Nemlekar) सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत राणी चेन्नम्माच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. स्वराज्य राखून ते वृद्धिंगत करण्याचा महाराणी ताराराणी यांचा प्रवास प्रेक्षकांना भारावून टाकणारा आहे. अपूर्वाचा चाहतावर्ग मोठा असून तिला नवनवीन भूमिकांत पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. या भूमिकेतसुद्धा अपूर्वा प्रेक्षकांची मनं नक्की जिंकेल.

रायगडावर भाऊबंदकी माजून स्वराज्य संपेल, ही औरंगजेबाची अटकळ फोल ठरून राजाराम महाराजांचं मंचकारोहण झालं. औरंगजेबाच्या सततच्या षड्यंत्रांमुळे स्वराज्याच्या छत्रपतींचे रक्षण महत्त्वाचे, ही भूमिका घेऊन ताराराणींनी राजाराम राजेंना जिंजीस जाऊन राहायचा सल्ला दिला. खूप विचार विनिमयानंतर ते यासाठी तयार झाले. जिंजी हा स्वराज्यातला दक्षिणेकडचा अजिंक्य असा किल्ला होता, पण तिथे पोचण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास करून जावं लागणार होतं. या प्रवासात जिवाचा धोका होता आणि औरंगजेबाचं सैन्य सतत राजाराम राजेंच्या मागावर होतं. त्या वेळी ताराराणींनी राणी चेन्नम्मा यांची मदत घ्यायचं ठरवलं.

काय पाहण्यास मिळेल या मालिकेत
औरंगजेबाचा धोका माहीत असूनही राणी चेन्नम्मा राजांना मदत करतील का आणि राजाराम राजे जिंजीला सुखरूप पोहचू शकतील का याची उत्तरे मालिकेतून मिळतील. हा ताराराणींच्या कालखंडातला राणी चेन्नम्मा यांचा अत्यंत नाट्यमय घटनांनी भरलेला महत्त्वाचा टप्पा 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत उलगडणार आहे.
हेही वाचा -Kirti Shiledar No More : ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे पुण्यात निधन

ABOUT THE AUTHOR

...view details