‘इनोसंट बॉय’ बनून ट्रोल करणाऱ्याला तरूणाला अपूर्वा नेमळेकरनं दिलं सडेतोड प्रत्युत्तर - Apoorva Nemalekar gave a blunt reply
अपूर्वा नेमळेकर ही ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘तुझं माझं जमतंय’ नवीन मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याच्या प्रोमोमध्ये ती पम्मी या नव्या अवतारात दिसणार आहे. पण यावरुन तिला काही जणांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अपूर्वाने सडेतोड उत्तर देऊन नेटिझन्सचे तोंड बंद केले आहे.
![‘इनोसंट बॉय’ बनून ट्रोल करणाऱ्याला तरूणाला अपूर्वा नेमळेकरनं दिलं सडेतोड प्रत्युत्तर Apoorva Nemalekar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9159898-294-9159898-1602585131339.jpg)
मुंबई - अपूर्वा नेमळेकरच्या टेलिव्हिजनवरील पुनरागमनामुळे तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. लवकरच अपूर्वा ही ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘तुझं माझं जमतंय’ नवीन मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमोदेखील रिलीज झाला आहे. या प्रोमोतून अपूर्वाच्या ‘पम्मी’ या नव्या व्यक्तिरेखेची झलक देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पम्मीला पाहून प्रेक्षक शेवंताला विसरून जातील आणि पम्मीच्या प्रेमात पडतील असं मत अपूर्वाने व्यक्त केलं आहे. तिच्या या नव्या अवताराला सोशल मीडियावर देखील तिच्या फॅन्सनी उदंड प्रतिसाद दिला.