अनुष्का शर्माने विराटला करून दिली मैदानावरची आठवण, कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया - latest bollywood news
अनुष्काने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का विराटला क्रिकेटच्या मैदानावरची आठवण करून देताना दिसते.
मुंबई - कला आणि क्रिकेट विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली. या दोघांच्या जोडीची सोशल मीडियावर बरीच चर्चा असते. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. अनुष्काने त्यांच्या धमाल मस्तीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या भरभरून कॉमेंट्स मिळाल्या आहेत.
अनुष्काने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का विराटला क्रिकेटच्या मैदानावरची आठवण करून देताना दिसते. तिची मजेदार कॉमेन्ट्री पाहून विराटच्या चेहऱ्यावरचे हावभाव लगेच बदलताना दिसतात. त्यांच्या या व्हिडिओवर कलाविश्वातील कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.