मुंबई -अभिनेत्री अनुष्का शर्माची निर्मिती असलेली 'पाताल लोक' ही मालिका सध्या गाजत आहे. अनुष्काने स्टारपद मिळवल्यानंतर वयाच्या २५ व्या वर्षी निर्माती होण्याचा धाडसी निर्णय घेतला. स्वयं निर्मित चित्रपटात अभिनय करण्यासाठी चित्रपट बनवण्यास सुरुवात केली नसल्याचेही तिने सांगितले.
अनुष्का म्हणाली, ''चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी, या स्थितीचा चांगला लाभ उठवण्यासाठी मी निर्मितीच्या क्षेत्रात उतरले आहे. मी स्वत: ला 'स्टार' बनवण्यासाठी चित्रपटांची निर्मिती सुरू केलेली नाही. मी बसून लेखकांशी बातचीत करेन, त्यांच्यासोबत काही गोष्टींवर चर्चा करेन जेणे करुन खास प्रकारचे चित्रपट का तयार होत नाहीत?''