मुंबई - फिल्म निर्माता अनुराग कश्यप आणि लेखक वरुण ग्रोव्हर यांच्यासह कॉमेडियन कुणाल कामरा कोविड-19 टेस्ट किट्ससाठी फंड जमा करण्याच्या कामात गुंतले आहेत. हा फंड उभा करण्यासाठी ते आपल्याला मिळालेल्या पुरस्कराच्या ट्रॉफी लिलाव करणार आहेत.
अनुराग कश्यप-वरूण ग्रोवर आपल्या ट्रॉफीचा करणार लिलाव, कोरोना टेस्टिंग किट्ससाठी जमवणार निधी - अनुराग करणार लिलाव
अनुराग कश्यप आणि लेखक वरुण ग्रोव्हरने कोविड टेस्ट किट्ससाठी फंड जमवण्यासाठी आपल्या ट्रॉफींचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. येत्या ३० दिवसामध्ये १३ लाख ४४ हजार रुपये त्यांना जमवायचे आहेत. यातून १० किट्स येतील आणि त्यामुळे हजारो लोकांच्या तपासण्या होण्यास मदत होईल.
या मोहिमेचा उद्देश १३ लाख ४४ हजार रुपये येत्या ३० दिवसात उभे करायचा आहे. यातून १० किट्स येतील आणि त्यातून हजोरा लोकांची तपासणी होईल. कश्यप यांनी ट्विटरवर लिहिलंय, की जो सर्वात जास्त बोली लावेल त्याला गँग्ज ऑफ वासेपूरसाठी मिळालेली क्रिटिक्स चॉइस ऑफ बेस्ट फिल्मची ओरिजिनल ट्रॉफी देण्यात येईल. वरुण ग्रोव्हरने अवॉर्डचा फोटो शेअर केला आहे. आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या भूमिका असलेल्या 'दम लगा के हईशा' या चित्रपटातील 'मोह मोह के धागे' या गाण्याच्या लिखाणासाठी वरूणला हा पुरस्कार मिळालेला होता.
कुणाल कामराने त्याला मिळालेला यू-ट्यूब बटन क्रिएटर अवॉर्ड लिलाव करायचे ठरवले आहे. यामुळे सर्व लोकप्रिय चॅनल या बोलीत सहभागी होतील, अशी त्याला अपेक्षा आहे. दिग्दर्शक नीरज घेवाण यानेही या लिलावासाठी आपली ट्रॉफी देण्याचा निर्णय घेत या मोहिमेला पाठिंबा दर्शवलाय. त्याने सर्व चाहत्यांना आणि कलाकारांना ट्विट करुन याची माहिती दिली आहे.