महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशीच्या निर्णयाबद्दल अंकिताने मानले आभार

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात, सीबीआय चौकशीसाठी केंद्र सरकारने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान ही माहिती देण्यात आली. यावर सुशांतची माजी मैत्रीण अंकिता लोखंडे हिने ट्वीट करून कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हणाली, ज्या क्षणाची आपण सर्वांनी वाट पाहिली होती, तो शेवटी आली आहे.

CBI probe into Sushant Singh Rajput's death
सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशी

By

Published : Aug 5, 2020, 9:38 PM IST

मुंबई: अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीसाठी केंद्राच्या संमतीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

सुशांतबरोबर जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये असलेल्या अंकिताने ट्वीट केले की, “ज्या क्षणाची आम्ही सर्वांनी वाट पाहिली होती, तो क्षण शेवटी आला आहे.” पोस्ट सोबत असलेल्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे, “कृतज्ञता”.

अंकिताच्या या पोस्टवर बर्‍याच सेलेब्सच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर प्रथमच पोस्ट शेअर केली आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशी करण्यासाठी बिहार सरकारने दिलेली शिफारस केंद्र सरकारने मान्य केली असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले.

हेही वाचा - "माझ्या घरी कोणतीही पार्टी झाली नाही", सुशांत प्रकरणी नाव आल्याने दिनो मोरियाने केला खुलासा

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती हिने पाटणा येथून मुंबईकडे चौकशी हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली असून, सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना तीन दिवसांत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. एका आठवड्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल.

सुशांतसिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. पोलिस त्याच्या मृत्यूचा शोध घेत होते. त्याचवेळी 26 जुलै रोजी सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी पाटणा येथे रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये त्यांनी रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप देखील केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details