मुंबई-‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे आणि या प्रतिसादामुळेच मालिकेने २५० भागांचा टप्पा नुकताच पार केला. छोट्या पडद्यावरील संकटात असणाऱ्या व्यक्तिरेखांच्या जीवनातील गुंत्यामुळे खऱ्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स काही काळापुरते विसरायला होतात. हिंदीमधील ‘अनुपमा’ ज्याची मराठी आवृत्ती ‘आई कुठे काय करते’ मधील प्रमुख व्यक्तिरेखांवर होत असलेले जुलमी अत्याचार बघून मालिकेला प्रेक्षकांची सहानुभूती मिळतेय. खरंतर, ही मालिका टॉप ५ मध्ये असते आणि प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. स्टार प्रवाहवरील हीच प्रेक्षकप्रिय मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत आता होणार अंकिताचं पोलखोल! - aai kuthe kai karte seriyal
‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होते
अंकिताच्या नाट्याविषयी अनिरुद्धला कल्पना
अभिषेकशी लग्न व्हावं म्हणून अंकिताने आत्महत्येचं खोटं नाटक रचलं. अंकिताच्या या वागण्याचा अभिषेकसोबतच संपूर्ण कुटुंबाला संशय होताच आता अखेरीस अंकिताचं पोलखोल होणार आहे. अंकिताने आत्महत्येचं हे खोटं नाट्य कसं रचलं, यात कोण कोण सामील होतं हे सारं आता उघड होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंकिताच्या या नाट्याविषयी अनिरुद्धला कल्पना होती. अंकिताच्या महानाट्याचा पर्दाफाश होणार असून देशमुख कुटुंब काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अंकिताचं पितळ उघडं
अनिरुद्धला सर्व माहित असूनही त्याने या सर्व गोष्टींवर मौन धरलं हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे. अरुंधती आणि अनिरुद्धचं नातं अतिशय नाजूक वळणावर असताना अनिरुद्धच्या अश्या वागण्याने अरुंधती पुन्हा एकदा दुखावली गेली आहे. आतापर्यंत प्रत्येक संकटाचा देशमुख कुटुंबाने एकत्र येऊन धीराने सामना केला आहे. त्यामुळे अंकिताचं पितळ उघडं पडल्यावर देशमुख कुटुंब काय निर्णय घेणार याची उत्कंठा वाढली आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबात पुन्हा एकदा उलथापालथ होणार आहे.