मुंबई -बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याने एकापाठोएक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. २०१८ साली त्याचा 'अंधाधून' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार व्यवसाय केला होता. आता या चित्रपटाचा तेलुगू भाषेत रिमेक होणार आहे. हैदराबाद येथे या चित्रपटाचा तेलुगू रिमेक लॉन्च करण्यात येणार आहे.
दाक्षिणात्य अभिनेता नितीन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. अद्याप या चित्रपटाचे शिर्षक ठरलेले नाही. मेरलापाका गांधी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, एन. सुधाकर रेड्डी आणि निकीता रेड्डी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. जून २०२० मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा -'कुली नंबर वन'च्या सेटवर सारा-वरुणचा रोमॅन्टिक अंदाज, शेअर केला फोटो