महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लोककलावंतांना किमान आर्थिक मदत द्यावी, आनंद शिंदे यांची मागणी - लोककला कलावंतांना किमान आर्थिक मदत घ्यावी आनंद शिंदे यांची मागणी

असंख्य मराठी कलावंत घरात राहुन सरकारच्या आदेशाचे व सूचनांचे पालन करत सरकारच्या प्रत्येक आवाहनाला सहकार्य करीत आहे. त्यामुळे घरी बसलेल्या कलाकाराला किमान आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी गायक आनंद शिंदे यांनी केली आहे.

Anand Shinde
आनंद शिंदे

By

Published : Mar 29, 2020, 8:13 PM IST

मुंबई - महाराष्ट्राची लोककला व लोकपरंपरा जिवंत ठेवणाऱ्या कलावंत व त्यांचे सहकारी यांना उपजीविकेसाठी किमान आर्थिक मदत करण्याची मागणी गायक आनंद शिंदे यांनी केली आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे समजून माझ्यासारखे असंख्य मराठी कलावंत घरात राहुन सरकारच्या आदेशाचे व सूचनांचे पालन करत सरकारच्या प्रत्येक आवाहानाला सहकार्य करीत आहे. त्यामुळे घरी बसलेल्या कलाकाराला किमान आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

आनंद शिंदे

महाराष्ट्राला लोककलेचा व परंपरेचा इतिहास आहे. लावणी, भारूड, वग, लोकसंगीत, तमाशा, जागरण गोंधळ, ढोल लेझीम, बॅन्जो पथक अशा कित्येक प्रकारातून हे कलाकार आपली लोककला सादर करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. चैत्र महिनापासून महाराष्ट्रातील अनेक गावाच्या जत्रा व यात्रांना सुरवात होत असते. शिवजयंती, आंबेडकर जयंती, लग्न समारंभ अशा विविध कार्यक्रमात या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असते. यातून मिळणाऱ्या मानधनावर यांचा कुटुबांचा उदरनिर्वाह चालतो. गर्दी आणि कार्यक्रम टाळण्याचा आदेश सरकारने दिल्याने यात्रा, जत्रेमध्ये मनोरंजनात्मक न ठेवता यात्रा करण्यावर गाव कारभार्‍यांचा भर आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या कार्यक्रमाचे केलेले बुकिंगही रद्द करण्यात येत आहेत.

महाराष्ट्रात ४० हजाराच्या जवळपास लोककलावंत आहे. कोरोना व्हायरसमुळे शासनाने लॉकडाऊनचा आदेश दिला. त्यामुळे आपली कला सादर करून उदरनिर्वाह करणाऱ्या या हातावर पोट असणाऱ्या या कलाकारांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी, ही मागणी शिंदे व त्यांचा कुटुंबाने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details