मुंबई- अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थचे चाहतेही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्याच्या आठवणीने त्याची खास मैत्रीणी शहनाझ गील व्याकुळ झालेली दिसत आहे. सिध्दार्थ आणि तिच्या जोडीला लोक सिडनाझ या नावानेच ओळखत होते. यातील सिड निघून गेल्याने नाझच्या एकटेपणाने शहनाझ भावूक झालेली दिसली.
सिध्दार्थच्या आठवणीत शहनाझ भावूक
सोशल मीडियावर शहनाजचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यात ती एक पंजाबी गाणं गात खूप दु:खी स्वरात गाताना दिसते. हा व्हिडीओ शहनाजच्या एका फॅन क्लबने पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडिओवर भरपूर कॉमेंट्स तिला मिळत असून अनेकांनी तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केलाय. अनेक जण या दुःखातून तिला सावरण्याचा सल्ला देत आहेत. सिद्धार्थचे निधन 2 सप्टेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने झाले होते.