मुंबई -अभिनेत्री एमी जॅक्सन बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मागच्या वर्षी २३ सप्टेंबरला तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. लग्नाअगोदरच गरोदर राहिलेल्या एमीची बरीच चर्चा झाली होती. मात्र, एमी सध्या तिचे मातृत्व एन्जॉय करत आहे. तिचा मुलगा अँड्रियासचे बरेच फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा मुलगा अगदी तिच्याप्रमाणेच गोड असल्याचे या फोटोमध्ये दिसते.
एमी आणि तिच्या मुलाच्या फोटोंवर चाहत्यांच्याही बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळतात. आताही तिने तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये तिच्या मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने 'मम्मीज बॉय' असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो अनेकांनी तिचा मुलगा खूपच क्यूट असल्याचे म्हटले आहे.