महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमृता खानविलकरने सुरु केले स्वतःचे यूट्यूब चॅनेल! - अमृता खानविलकरने सुरु केले यूट्यूब चॅनेल!

सोशल मीडियावर स्टार्स आपल्या खाजगी आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी फॅन्ससोबर शेयर करीत असतात. आता यात मराठी कलाकारही सामील झाले आहेत. आपल्याबद्दलच्या सर्व खास गोष्टी चाहत्यांसमोर आणण्यासाठी सुस्वरूप अभिनेत्री-नृत्यांगना अमृता खानविलकरने स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल सुरु केले आहे.

amrita-khanwilkar
अमृता खानविलकर

By

Published : Aug 14, 2021, 3:27 PM IST

Updated : Aug 14, 2021, 3:41 PM IST

फॅन्स आणि प्रेक्षकांना सिनेकलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल कुतूहल असते. पूर्वी फॅन-मेल असायची आणि आता सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावर स्टार्स आपल्या खाजगी आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी फॅन्ससोबर शेयर करीत असतात. आता यात मराठी कलाकारही सामील झाले आहेत. आपल्याबद्दलच्या सर्व खास गोष्टी चाहत्यांसमोर आणण्यासाठी सुस्वरूप अभिनेत्री-नृत्यांगना अमृता खानविलकरने स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल सुरु केले आहे.

अमृता खानविलकर, मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री. मराठीसोबतच हिंदीतही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. सौंदर्य आणि अभिनयाचा सुंदर मिलाफ असणाऱ्या या अभिनेत्रीच्या नृत्याविष्काराचेही अनेक चाहते आहेत. मागील काही महिन्यांपासून अमृता सोशल मीडियावर 'अमृतकला' अंतर्गत तिच्या अप्रतिम नृत्याचे व्हिडीओज शेअर करत होती. त्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रेमामुळेच अमृताने चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. अमृताने अधिकृतरित्या स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरु केले असून ते आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

अमृता खानविलकर

या यूट्यूब चॅनेलद्वारे अमृताचा सकाळचा दिवस कसा सुरु होतो, स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती काय करते, तिचा डाएट, तिला कशा प्रकारचे कपडे घालायला आवडतात, कुठे फिरायला, शॉपिंगला आवडते, आईसोबत ती कसा वेळ घालवते, एकंदर तिचे लाइफस्टाईल, तिच्या आवडीनिवडी, नृत्य, अभिनय अशा तिच्यासंबंधित अनेक गोष्टींचा उलगडा यात होणार आहे. आपल्या आवडत्या कलाकाराचा दिनक्रम, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या आवडत्या जागा, पदार्थ अशा सगळ्याच गोष्टी जाणून घेण्याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता असते. अमृताने हाच नजराणा आपल्या चाहत्यांसाठी खास आणला आहे. या संदर्भातील पहिला व्हिडिओ तिने शेअर केला असून त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

अमृता खानविलकर

आपल्या या नवीन उपक्रमाबद्दल अमृता खानविलकर म्हणाली, ''चाहत्यांना नेहमीच त्याच्या आवडत्या कलाकाराच्या लाइफस्टाईलविषयी कुतूहल असते आणि म्हणूनच मी माझ्या चाहत्यांसोबत माझ्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करणार आहे. खरं सांगायचे तर 'अमृतकला'ला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रतिसादानंतरच स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरु करण्यासाठी अधिक प्रेरित झाले. यात अनेक गोष्टींचा समावेश असेल. हळूहळू ते तुम्हाला कळेलच. सध्यातरी महिन्याला किमान चार -पाच व्हिडिओ शेअर करण्याचा विचार आहे. पुढे बघू कसे जुळून येतेय.”

अमृता खानविलकर

हेही वाचा - अभिनेता प्रकाश राजच्या डाव्या खांद्यावर शस्त्रक्रिया, सुखरुप असल्याचा चाहत्यांना संदेश

Last Updated : Aug 14, 2021, 3:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details