महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

एका मोठ्या पर्वाचा अंत झाला - अमोल पालेकर - Dr. Shriram Lagoo pass away

डॉ. श्रीराम लागूंच्या निधनानंतर अनेक दिग्गज त्यांना श्रध्दांजली वाहत त्यांच्या आठवणी जागवत आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला

Amol Palekar
अमोल पालेकर

By

Published : Dec 18, 2019, 4:55 PM IST

डॉ. श्रीराम लागूंच्या निधनाने मराठी रंगभूमी, सिनेमा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज त्यांना श्रध्दांजली वाहत त्यांच्या आठवणी जागवत आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला, पालेकर म्हणाले, मराठी रंगभूमीला सुवर्णकाळापर्यंत घेऊन जाणारे जे दिगग्ज होते, त्यात डॉ श्रीराम लागू यांचं व्यक्तिमत्त्व प्रचंड मोठं होतं..माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मला त्यांच्यासोबत काम करायला मिळाले...त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले..त्यांचा मला अतिस्नेह लाभला हे माझे मोठे भाग्य म्हणायला पाहिजे..''

ज्येष्ठ अभिनेता अमोल पालेकर

पुढे बोलताना पालेकर म्हणाले, ''अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाकडून नाटक, अभिनय नाही तर अजून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या...आयुष्याबद्दल वेगळा दृष्टिकोन देणारी शिकवण ज्या काही मोजक्या मंडळींनी दिली त्यात लागू यांचे नाव अग्रक्रमाने आहे..त्यांना सर्वार्थाने शांती लाभो...''

ABOUT THE AUTHOR

...view details