सोलापूर - मुंबईतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या वतीने चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे निमंत्रक अमोल पालेकर हे 'इनसाईड द इम्प्टी बॉक्स' या विषयावर बोलत असताना, त्यांनी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या चुकीच्या धोरणावर टीका केली. त्याला एमजीएमच्या कांही सदस्यांनी आक्षेप घेतला अन केंद्र सरकारवर टीका करू नका असं बजावलं.
अमोल पालेकरांचं भाषण रोखलं : साहित्य कलाविश्वातून नाराजीचा सूर
सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या विरोधात बोलल्याने अमोल पालेकर यांना भाषण करताना रोखण्यात आले. ही असहिष्णुता असल्याची प्रतिक्रिया कवी विठ्ठल वाघ आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केलीय.
अमोल पालेकर