मुंबई - महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपले अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असतात. त्यांच्या मुलांसाठीही ते पोस्ट शेअर करतात. त्यांची मुलगी श्वेता नंदा हिने अलिकडेच तिच्या फॅशन ब्रँडसाठी फॅशन शोचे आयोजन केले होते. आपल्या मुलीचे हे काम पाहून बिग बी भावुक झाले होते.
अमिताभ यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करुन श्वेतासाठी एक पोस्ट लिहली. फॅशन शो दरम्यानचेही काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
हेही वाचा -विक्रम गोखलेंसाठी 'बिग बी' लावणार का हजेरी? पाहा, 'एबी आणि सीडी'चा टीझर
श्वेताने या फॅशन शो दरम्यान अमिताभ यांच्या फोटोची डिझाईन असलेले डेनिम जॅकेट परिधान केले होते. या शोमध्ये श्वेता देखील भावुक झाली होती. जया बच्चन यांनी श्वेताच्या या फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, अमिताभ बच्चन हे आगामी ५ चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये 'चेहरे', 'गुलाबो सिताबो', ब्रम्हास्त्र हे हिंदी चित्रपट आणि 'झुंड' तसेच 'एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटांचा समावेश आहे.
हिंदी सिनेसृष्टीनंतर आता मराठीमध्ये बिग बींची भूमिका पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
हेही वाचा -'फ्रेंड्स'चं होणार रियुनियन, 'या' कारणासाठी येणार पुन्हा एकत्र