मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी गेली 21 वर्षे लोकप्रियतेच्या शीखरावर असलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या गेम शोच्या नवीन सीझनला सुरुवात केली. शोच्या सुरुवातीच्या आठवणीत या निमित्ताने बिग बी रमलेला दिसला. या शोवर निरंतर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे त्याने आभार मानले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी बुधवारी इन्स्टाग्रामवर शोच्या सेटचा फोटो शेअर केला आहे.
मंगळवारी शोच्या 13 व्या सीझनचे शूटिंग सुरू करणाऱ्या मेगास्टार बच्चनने लिहिले, "2000 पासून त्या खुर्चीकडे नजर धावते...21 वर्षे झाली... या काळात जे लोक सोबत आले, त्या सर्वांचे आभार.''