महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चित्रपटसृष्टीत पक्षपातीपणा आहे, पण...: अमित साध - अमित साध सहमत आहे की चित्रपटसृष्टीत पक्षपात आहे

"७ कदम" या वेब सीरिजचा एक भाग असलेला अभिनेता अमित साध सहमत आहे की, चित्रपटसृष्टीत पक्षपातीपणा आहे. तो सर्वच व्यवसायात असतो. परंतु प्रतिक्षा असेल तर लोक पाठीशी उभे राहतात, असेही तो स्वअनुभवावरुन सांगतो.

Amit Sadh
अमित साध

By

Published : Mar 30, 2021, 7:22 PM IST

मुंबई - अभिनेता अमित साध सहमत आहे की चित्रपटसृष्टीत पक्षपात आहे, परंतु असा पक्षपात सर्वच व्यवसायात असतो असेही त्याला वाटते.

''फेवरॅटिझम सर्व जगात अस्तित्वात आहे, प्रत्येक व्यवसायात तो आहे, परंतु तरीही असेही लोक आहेत जे मला आणि माझ्या प्रतिभेला महत्त्व देऊन माझ्या मागे ठाम उभे राहतात.'', असे अमित म्हणाला.

आपल्या कारकिर्दीत भाग्यवान असल्याचे अभिनेता अमित साध म्हणतो. तो म्हणाला, "मी खूप भाग्यवान आहे आणि मी नेहमीच सकारात्मक असतो. कोणत्याही उद्योगात प्रत्येकाने प्रत्येकाबरोबर काम करण्याची गरज नसते हे आपल्याला समजले पाहिजे. तथापि, कलाकार म्हणून आपण अंतिम ध्येय पूर्ण केले पाहिजे."

“७ कदम” वेब सीरिजचा भाग असलेला अमित म्हणतो की एखाद्या अभिनेत्याचे अंतिम लक्ष्य चांगला आशय तयार करणे हेच असायला पाहिजे.

तो पुढे म्हणाला, "प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही इथे आहोत आणि जबाबदार सिनेमा बनवण्याचीही जबाबदारी आपल्यावर आहे, कारण आपल्या देशात सिनेमाचा मोठा प्रभाव आहे."

हेही वाचा - ऋषी कपूर अजिबात चांगला डान्सर नव्हता आणि रणबीर अतिशय वाईट गातो : नीतू कपूर!

ABOUT THE AUTHOR

...view details