महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

फुरसुंगीच्या 'फास्टर फेणे'ची कथा सांगतोय अमेय वाघ! - स्टोरीटेल अ‌ॅप फास्टर फेणे कथा

फास्टर फेणे म्हटलं की आपल्याला अमेय वाघ आठवतो. त्याने चित्रपटात साकारलेली बनेश फेणेची भूमिका सर्वांना आवडली होती. आता याच बनेश फेणेच्या गोष्टी ऑडिओ स्वरुपात आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. अमेय वाघच्या आवाजात फास्टर फेणेच्या सर्व कथा स्टोरीटेल अ‌ॅपवर उपलब्ध होणार आहेत.

Faster Fene stories in the voice of Ameya Wagh
अमेय वाघ

By

Published : May 7, 2021, 7:09 AM IST

मुंबई - अगोदर मराठी मुलांच्या लहानपणी ‘फास्टर फेणे’च्या कथा बऱ्याच प्रसिद्ध होत्या. या पुस्तकांचे लेखन प्रसिद्ध मराठी लेखक भास्कर रामचंद्र भागवत ऊर्फ भा.रा. भागवत यांनी केले आहे. 'फास्टर फेणे' ही मराठी भाषेतील प्रचंड लोकप्रिय ठरलेली पहिली बाल साहस कादंबर्‍यांची मालिका आहे. ही मालिका बनेश फेणे या साहसी मुलाच्या आयुष्यात घडणार्‍या रहस्यमय, अद्भुत साहसी प्रसंगांवर आधारित आहे. यातील प्रमुख पात्र बनेश फेणे उर्फ ‘फास्टर फेणे’ यावर आधारित त्याच नावाचा मराठी चित्रपटही येऊन गेला. ज्यात मराठीतील स्टार अमेय वाघ याने प्रमुख भूमिका साकारली होती. आता स्टोरीटेलवर ऑडिओबुक्सच्या रूपात अमेय ‘फास्टर फेणे’च्या कथा सांगणार आहे.

फास्टर फेणेच्या सर्व कथा अमेय वाघच्या आवाजात स्टोरीटेल अ‌ॅपवर उपलब्ध झाल्या आहेत

फास्टर फेणे या पुस्तक मालिकेत 'फुरसुंगीचा फास्टर फेणे', 'आगे बढो फास्टर फेणे', 'बालबहाद्दर फास्टर फेणे', 'जवानमर्द फास्टर फेणे', 'फास्टर फेणेचा रणरंग', 'ट्रिंग ट्रिंग फास्टर फेणे', 'फास्टर फेणेची एक्स्प्रेस कामगिरी', 'फास्टर फेणे टोला हाणतो', 'फास्टर फेणे डिटेक्टिव्ह', 'फास्टर फेणेची काश्मिरी करामत', 'प्रतापगडावर फास्टर फेणे', 'गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणे', 'चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे', 'फास्टर फेणेची डोंगरभेट', 'फास्टर फेणेच्या गळ्यात माळ', 'चक्रीवादळात फास्टर फेणे', 'चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणे', 'विमानचोर विरुद्ध फास्टर फेणे', 'जंगलपटात फास्टर फेणे', 'टिक टॉक फास्टर फेणे' या २० पुस्तकांचा समावेश आहे.

फास्टर फेणे ही कथा आता स्टोरीटेलवर ऐकायला मिळणार आहे
बनेश फेणे धावण्यात व सायकल चालविण्यात अत्यंत चपळ असल्याने त्याला त्याच्या मित्रांनी फास्टर फेणे हे टोपणनाव दिले होते. तो आव्हानांना झेलायला सतत तयार असणारा एक शाळकरी मुलगा आहे. तो पुणे येथील विद्याभुवन शाळेत शिकतो. त्याचा जन्म पुण्याजवळील फुरसुंगी या गावात झाला आहे. फास्टर फेणेच्या साहसी कथा प्रामुख्याने पुणे व आसपासच्या परिसरात घडतात. मात्र, काही कथांमध्ये मुंबई, काश्मीर, इंडो-चायना बॉर्डर इतकेच नव्हे तर अफगाणिस्तानमध्ये देखील तो साहसी कृत्ये करताना दिसतो. त्याच्या मते त्याला साहसी कृत्ये करायची नसतात पण संकटेच त्याच्या पाठीमागे लागतात आणि मग त्याला त्यातून बाहेर पडण्याशिवाय मार्ग उरत नाही. अमेय वाघ याच्या आवाजातील डिजिटल ऑडिओ कथा ऐकताना मुलांना खूप मजा येणार आहे. 'स्टोरीटेल'च्या या ऑडिओबुकमुळे बच्चेकंपनीचे समर व्हेकेशन द्विगुणित होणार असून त्यांची ही उन्हाळी सुट्टी विशेष ठरणार आहे.

भा.रा. भागवतांच्या 'फास्टर फेणे' या मालिकेतील पहिले पुस्तक १९७४ साली प्रकाशित झाले होते. 'फास्टर फेणे' हे महाराष्ट्रातील लोकप्रिय गुप्तहेर पात्रांपैकी एक आहे. या मालिकेची भाषांतरे इंग्रजी व हिंदी भाषांमध्येही झाली आहेत. १९८७ मध्ये दूरदर्शनवर 'फास्टर फेणे'च्या कथांवर आधारित मालिका सादर करण्यात आली होती. या मालिकेत सुमीत राघवनने फास्टर फेणेची भूमिका तर नुकताच येऊन गेलेल्या 'फास्टर फेणे' चित्रपटात अमेय वाघने फेणेची भूमिका केली होती. आता त्याच्याच लोकप्रिय आवाजात ही ऑडिओबुकची मालिका 'स्टोरीटेल'ने बालदोस्तांसाठी आणली आहे.

'स्टोरीटेल'च्या निमित्ताने मराठीतच नव्हे तर सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. गुगलप्ले स्टोअर किंवा ॲपस्टोअरवर जाऊन 'स्टोरीटेल' हे ॲप सहज डाऊनलोड करता येते किंवा www.storytel.com या वेबसाईटवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करणे खूपच सोपे आहे. फक्त दरमहा २९९ रुपयांमध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा ११९ रुपयांमध्ये फक्त मराठी पुस्तके 'सिलेक्ट मराठी' योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.

ABOUT THE AUTHOR

...view details