मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अल्पावधीतच तिने तिच्या अभिनयाची दमदार छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. अभिनयासोबतच तिने आता निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. लवकरच ती एक प्रोडक्शन हाऊस काढणार आहे. त्याचे नावही तिने ठरविले आहे.
आलिया भट्ट बनणार निर्माती, प्रोडक्शन हाऊसला दिले 'हे' नाव - bramhastra
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अल्पावधीतच तिने तिच्या अभिनयाची दमदार छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. अभिनयासोबतच तिने आता निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. लवकरच ती एक प्रोडक्शन हाऊस काढणार आहे. त्याचे नावही तिने ठरविले आहे.
![आलिया भट्ट बनणार निर्माती, प्रोडक्शन हाऊसला दिले 'हे' नाव](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2615394-81-390030b3-915f-4f52-99c2-5ef9a91627f1.jpg)
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले, की 'इटरनल सनशाईन प्रोडक्शन' असे तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव असणार आहे. यासाठी तिने एक टीमही तयार केली आहे. यामध्ये कोणते चित्रपट तयार होणार याची पूर्वतयारी सुरू आहे. या प्रोडक्शन हाऊसमध्ये मला अशा चित्रपटांची निर्मिती करायची आहे, जे मला स्वत:लाही पाहायला आवडतील', असेही तिने सांगितले.
अलिकडेच आलिया रणवीर सिंगसोबत 'गली बॉय' चित्रपटात झळकली. आता ती रणबीर कपूरसोबत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा लोगो प्रदर्शित करण्यात आला आहे.