महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

फिल्मफेअर पुरस्कार २०१९: आलिया-रणबीर सर्वोत्कृष्ट कलाकार, 'अंधाधून', 'बधाई हो' चित्रपटांचीही बाजी - bollywood

सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रणबीर तर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आलिया भट्टला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या पाठोपाठ समीक्षक श्रेणीमध्ये  आयुष्मान खुराणाचा 'अंधाधून' आणि 'बधाई हो' हे दोन्हीही चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरले.

आलिया-रणबीर सर्वोत्कृष्ट कलाकार

By

Published : Mar 24, 2019, 4:49 PM IST

मुंबई - बॉलिवूडच्या कलाकारांसाठी सर्वोत्कृष्ट मानला जाणारा पुरस्कार म्हणजे 'फिल्मफेअर'. यंदाचा ६४वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मुंबईच्या 'जिओ गार्डन' येथे पार पडला. यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारावर बॉलिवूडचे लोकप्रिय कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रणबीर तर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आलिया भट्टला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या पाठोपाठ समीक्षक श्रेणीमध्ये आयुष्मान खुराणाचा 'अंधाधून' आणि 'बधाई हो' हे दोन्हीही चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरले.

वाचा पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणबीर कपूर (संजू)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (राजी)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) - रणवीर सिंग (पद्मावत) आणि आयुष्मान खुराणा (अंधाधून)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) - नीना गुप्ता (बधाई हो)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - गजराज राव (बधाई हो) आणि विकी कौशल (संजू)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सुरेखा सिक्री - (बधाई हो)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता)- ईशान खट्टर
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) - सारा अली खान
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - मेघना गुलजार (राजी)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण(दिग्दर्शक) - अमन कौशिक - (स्त्री)
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट- राजी
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) - अंधाधून
  • सर्वोत्कृष्ट कथा - मुल्क (अभिनव सिन्हा)
  • सर्वोत्कृष्ट गायक - अरिजित सिंग (ए वतन-राजी)
  • सर्वोत्कृष्ट गायिका - श्रेया घोषाल - (घुमर-पद्मावत)
  • सर्वोत्कृष्ट गीतकार- गुलजार (ए वतन-राजी)
  • सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- पंकज कुमार (तुम्बाड)

ABOUT THE AUTHOR

...view details