मुंबई - जॅकी भागनानी याच्या जस्ट म्यूझिकच्या वतीने द दुर्बिन बॉईजचे 'पर्दा' हे गाणे लाँच करण्यात आले आहे. या गाण्यात अभिनेत्री आलिया भट्ट अनोख्या अदा करीत असताना दिसते. यापुढे पार्टी साँगमध्ये या नव्या 'पर्दा' गाण्याची भर पडली असून तरुणाईला थिरकायला लावणारे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
द दुर्बिन बॉईजच्या 'पर्दा' गाण्यावर थिरकली आलिया भट्ट - Jacky Bhagnani
जस्ट म्यूझिकच्या वतीने द दुर्बिन बॉईजचे 'पर्दा' हे गाणे लाँच करण्यात आले आहे. या गाण्यावर आलिया भट्ट आणि द दुर्बिन थिरकताना दिसत आहेत.
![द दुर्बिन बॉईजच्या 'पर्दा' गाण्यावर थिरकली आलिया भट्ट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4121414-thumbnail-3x2-pp.jpg)
द दुर्बिन बॉईजचे 'पर्दा' हे गाणे लाँच
'पर्दा' गाण्यासाठी द दुर्बिन आणि श्रेया शर्मा यांनी स्वरसाज चढवला आहे. अर्थात हे गाणे द दुर्बिन यांनी संगीतबध्द केलंय. या गाण्यावर आलिया भट्ट आणि द दुर्बिन थिरकताना दिसत आहेत.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'पर्दा' गाण्याच्या लाँचची माहिती आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. पंजाबी धाटणीचे हे गाणे आजच्या तरुण पिढीची गरज ओळखून बनवण्यात आलंय.