महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सूर्यवंशी'च्या सेटवर कॅटरिनाने केली साफसफाई, अक्षयने शेअर केला मजेदार व्हिडिओ - Akshay Kumar latest news

शूटिंगदरम्यानही अक्षय काही धमाल व्हिडिओ पोस्ट करत असतो. कॅटरिनाचाही त्याने एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Akshay Kumar shares Katrina's funny BTS video from sets of Sooryavanshi
'सूर्यवंशी'च्या सेटवर कॅटरिनाने केली साफसफाई, अक्षयने शेअर केला मजेदार व्हिडिओ

By

Published : Feb 4, 2020, 8:37 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांची जोडी लवकरच 'सूर्यवंशी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे बरेच अपडेट्स आत्तापर्यंत सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लुक टीझर प्रदर्शित झाला होता. शूटिंगदरम्यानही अक्षय काही धमाल व्हिडिओ पोस्ट करत असतो. कॅटरिनाचाही त्याने एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती सेटवर झाडू घेऊन साफसफाई करताना पाहायला मिळते.

'सूर्यवंशीच्या सेटवर 'स्वच्छ भारत' अभियानाची नवी ब्रँड अ‌ॅम्बेसडर', असे मजेदार कॅप्शन अक्षयने या व्हिडिओला दिले आहे.

हेही वाचा -'मेकअप'साठी रिंकू -चिन्मय सोलापूरात...

'सूर्यवंशी' हा चित्रपट रोहीत शेट्टीच्या कॉप ड्रामातील चौथा चित्रपट आहे. यामध्ये अजय देवगन, रणवीर सिंग यांचीही भूमिका पाहायला मिळणार आहे. तर, जॅकी श्रॉफ यांचीही अलिकडेच एन्ट्री झाली आहे. याशिवाय रोहीत शेट्टी आणखी कोणते सरप्राईझ देणार, याचीही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. २७ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाशिवाय अक्षय 'लक्ष्मी बाँब', 'पृथ्वीराज', यांसारख्या चित्रपटातून यावर्षी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

हेही वाचा -परीक्षेच्या अगोदर अक्षयने लेकीला दिल्या कराटे टिप्स

ABOUT THE AUTHOR

...view details