महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिहार अन् आसाम पुरग्रस्त निधीसाठी अक्षय कुमारकडून प्रत्येकी १ कोटींचा निधी - बिहार आणि आसाम पुरग्रस्तांसाठी अक्षय कुमारची मदत

कोविड-१९ च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान निधीसाठी २५ कोटी रुपये दान दिले होते. आता हा बॉलिवूडचा खिलाडी कुमार बिहार आणि आसामच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला. त्याने दोन्ही रकारच्या मुख्यमंत्री निधीसाठी प्रत्येकी १ कोटीची मदत देऊ केलीय.

Akshay Kumar
अक्षय कुमार

By

Published : Aug 14, 2020, 6:24 PM IST

मुंबई - आपल्या देशातील लोकांना मदत करण्यासाठी किंवा नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या क्षेत्रातील मदतीसाठी नेहमी मदतीचा हात पुढे करणारा अभिनेता म्हणून अक्षय कुमारची ओळख आहे. अक्षयने आपापल्या जिल्ह्यातील सध्याच्या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी बिहार आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्याचे ठरविले आहे.

एका सूत्राने अग्रगण्य पोर्टलला सांगितले, "गुरुवारी अक्षय कुमार यांनी बिहार आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणे केले आणि त्यांच्या सहाय्यता निधीसाठी १-१ कोटींची मदत केली."

प्रियंका चोप्रा आणि तिचे पती निक जोनास यांनीही आसाम पूरग्रस्तांसाठी योगदान दिले आहे.

हेही वाचा - महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया, सोनू सूदचे 'पुढचे पाऊल'

प्रियंकाने ट्वीट केले, '' आम्ही सर्व अजूनही जागतिक साथीच्या आजाराच्या परिणामांना सामोरे जात आहोत, तर भारतात आसाम राज्यावर हे आणखी एक मोठे संकट ओढवले आहे. कोसळलेल्या मुसळधार पावसाने लाखो लोकांच्या जीवन पुरामुळे हे सर्व उद्ध्वस्त झाले आहे. जीवन आणि जमीन / मालमत्तेवर होणारा परिणाम अकल्पनीय आहे. वेगाने वाढणार्‍या पाण्याच्या पातळीमुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानालाही पूर आला आहे, हे जगातील एक उत्तम वन्यजीव अभयारण्य आहे. "

दरम्यान, वर्क फ्रंटवर अक्षय पुढील बेलबॉटममध्ये दिसणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details