उस्मानाबाद- येथे पार पडणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले. दि. 10, 11, 12 जानेवारी 2020 रोजी हे संमेलन होणार आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले.
93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन - 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन
93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. 10, 11, 12 जानेवारी 2020 रोजी होणार आहे. उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले.
93 वे साहित्य संमेलन हे संतश्रेष्ठ गोरा कुंभार यांच्या पावनभूमीत होत आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या बोधचिन्हामध्ये संत गोरा कुंभार यांची हाती चिपळ्या घेऊन भक्तीरसात तल्लीन झालेली प्रतिमा साकारण्यात आली आहे. तसेच संत गोरा कुंभार रचित त्यांच्या साहित्यप्रतिभेची आठवण करून देणाऱ्या ’म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे जग, हे करणे शहाणे बापा‘ या ओळी साकारल्या आहेत.
उस्मानाबाद येथील विजयकुमार यादव यांनी निर्मित केलेल्या बोधचिन्हाची निवड आयोजक समितीने केली आहे. साहित्य संमेलनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल यादव यांचा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्यात पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, डॉ.संजय तुबाकले, मनोज सानप, संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे, कार्याध्यक्ष रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.