महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'या' बॉलिवूड अभिनेत्याला आवडते कोल्हापूरी 'तांबड्या पांढऱ्या'ची थाळी - Ajinkya Dev latest news

राज्यातील विविध प्रांतातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आणि संस्कृतीसह 'थाळी महाराष्ट्राची' हा खाद्यमहोत्सव आजपासून चेंबूरमध्ये भरवण्यात आला आहे. या खाद्यमहोत्सवाचे उद्घाटन सिनेअभिनेता अजिंक्य देव यांनी केले. कोल्हापूरच्या स्टॉल वरील विविध मांसाहारी पदार्थ पाहून आपल्याला तांबडा आणि पांढरा रस्सा जास्त आवडतो असे आवर्जून सांगितले.

Ajinkya Dev like Kolhapuri
'थाळी महाराष्ट्राची' खाद्यमहोत्सव

By

Published : Feb 22, 2020, 8:36 AM IST

राज्यातील ग्रामीण महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांना आपले पाककौशल्य जनतेसमोर मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने, 'श्री राधा फाऊंडेशन'च्या वतीने 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान या महोत्सवाचे चेंबूर आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कोकण, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या प्रांतातील पदार्थांची चव या महोत्सवातून खवय्यांना घेता येणार आहे.

'थाळी महाराष्ट्राची' खाद्यमहोत्सव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये आहेत. यावर बोलताना खासदार राहुल शेवाळे म्हणाले, की राज्यात जीएसटीतून जो कर मिळतो त्या करामध्ये केंद्राकडून थोडेफार दिरंगाई होत आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या व केंद्राकडून आर्थिक सहाय्यासाठी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे सोनिया गांधी यांचीही मुख्यमंत्री भेट घेणार आहेत. एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी नुकतेच एका सभेत आक्षेपार्ह विधान केले होते. त्या विधानावर शिवसेनेचा कायमच विरोध आहे आणि शिवसेना वेळ आल्यावर योग्य तो निर्णय घेईल असे राहुल शेवाळे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details