महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अजय देवगन - संजय दत्त पुन्हा एकदा 'या' चित्रपटात येणार येकत्र, चित्रीकरणाला सुरुवात - mehbooba

अजय देवगन आणि संजय दत्त यांच्या जोडीने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 'ऑल द बेस्ट', 'रास्कल्स', 'सन ऑफ सरदार', 'मेहबुबा', यांसारख्या चित्रपटात त्यांनी एकत्र भूमिका साकारल्या आहेत.

अजय देवगन - संजय दत्त पुन्हा एकदा 'या' चित्रपटात येणार येकत्र, चित्रीकरणाला सुरुवात

By

Published : Jun 25, 2019, 10:31 AM IST

मुंबई - अभिनेता अजय देवगन आणि संजय दत्त लवकरच एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. आगामी 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटात ते एकत्र भूमिका साकारत आहेत. आजपासून म्हणजे २५ जूनपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये आजपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. या चित्रपटात अजय आणि संजय दत्तसोबत राणा दुगबत्ती, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा आणि अॅमी विर्क हे कलाकारही झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक दुधय्या करत आहेत. पुढच्या वर्षी १४ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

अजय देवगन आणि संजय दत्त यांच्या जोडीने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 'ऑल द बेस्ट', 'रास्कल्स', 'सन ऑफ सरदार', 'मेहबुबा', यांसारख्या चित्रपटात त्यांनी एकत्र भूमिका साकारल्या आहेत. आता पुन्हा एकदा 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटातून ते एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या टीमचा एक फोटो शेअर करुन याबाबत माहिती शेअर केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details