महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिषेक ऐश्वर्याच्या लग्नाच्या एक दिवस आधी घडली होती 'ही' घटना, हादरले होते बच्चन कुटुंब

आज ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाले आहेत. दोघांनीही 'रावण', 'कुछ ना कहो', 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या दोघांच्या रिल लाईफ केमेस्ट्रीप्रमाणेच त्यांची रिअल लाईफ केमेस्ट्री देखील चाहत्यांना आवडते.

अभिषेक ऐश्वर्याच्या लग्नाच्या एक दिवस आधी घडली होती 'ही' घटना

By

Published : Apr 20, 2019, 10:11 AM IST

मुंबई -बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. २० एप्रिल २००७ रोजी दोघेही विवाहबंधनात अडकले होते. बच्चन कुटुंबाच्या 'प्रतिक्षा' निवासस्थानी त्यांचा भव्यदिव्य लग्नसोहळा पार पडला होता. मात्र, त्यांच्या लग्नाच्या एक दिवस आधी एक अशी घटना घडली होती, ज्यामुळे बच्चन कुटुंबावर संकट आले होते.

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाच्या एक दिवस आधी जान्हवी कपूर नामक मॉडेलने 'प्रतिक्षा' निवासस्थानासमोर आपल्या हाताची नस कापली होती. अभिषेकसोबत आपले रिलेशनशिप असल्याचे तिने सांगितले होते. 'दस' चित्रपटाच्या दरम्यान त्या दोघांची ओळख झाली होती. 'दस बहाने' गाण्याच्या दरम्यान त्यांची ओळख झाली असल्याचे या मॉडेलने म्हटले होते. काही मित्रांसमोर आमचे लग्न झाले असल्याचाही गंभीर आरोप या मॉडेलने केला होता. तिला याबद्दल पुरावा मागितला असता, तिने म्हटले होते, की प्रेमाचा काहीही पुरावा नसतो. त्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आले. या घटनेने बच्चन कुटुंब हादरुन गेले होते.

आज ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाले आहेत. दोघांनीही 'रावण', 'कुछ ना कहो', 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या दोघांच्या रिल लाईफ केमेस्ट्रीप्रमाणेच त्यांची रिअल लाईफ केमेस्ट्री देखील चाहत्यांना आवडते. सध्या दोघेही मालदिव येथे एकमेकांसोबत वेळ घालवत आहे. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिषेकने ऐश्वर्याचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details