महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

टिक-टॉक प्रकरणात एजाज खानच्या पोलीस कोठडीत वाढ - contravesial tick tock video

टिक टॉकवर वादग्रस्त व्हिडिओ बनवणारा अभिनेता एजाज खान पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या पोलीस कोठडीत २० जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

एजाज खान

By

Published : Jul 20, 2019, 3:39 PM IST


मुंबई - वादग्रस्त टिक टॉक व्हिडिओ प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेला अभिनेता एजाज खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता त्याला २० जुलैपर्यंत गजाआड रहावे लागणार आहे.

बिग बॉसमध्ये चमकलेला एजाज खान सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. मात्र, यावेळी त्याचा मामला गंभीर आहे. गुरुवारपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एजाजची २० जुलैपर्यंत पोलीस कस्टडी वाढवण्यात आली आहे.

एजाजने अलिकडेच अपलोड केलेल्या व्हिडिओत एका विशिष्ठ धर्माच्या विरोधात भाष्य केले होते. यात त्याने मुंबई पोलिसांचीही खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. तबरेज अंसारीच्या लिंचींग केसच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ बनवल्याचे बोलले जात आहे.

एजाजने अपलोड केलेल्या व्हिडिओत दिसणाऱ्या लोकांच्या विरोधातही कारवाई होणार आहे. तशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी एक केसमध्ये एजाजला अटक झाली होती. एका होस्टेलमध्ये तो ड्रगसह सापडला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details