'द फॅमिली मॅन सिझन २' या वेब सिरीजचे प्रसारण ४ जूनपासून अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. मात्र या मालिकेत तमिळ इलम या संघटनेच्या योध्यांना दहशतवादी दाखवल्याचे आणि सामंथा साकारत असलेल्या व्यक्तीरेखाही दहशतवादी दाखवत तिचे संबंध पाकिस्तानी अतेरेक्यांशी असल्याचे दाखवल्यामुळे तमिळ जनतेच्या भावना दुखावल्याचे राज्य सभा खासदार वायको यांनी म्हटले आहे. ही मालिका प्रसारित होऊन देऊ नये अन्यथा तामिळनाडूतील जनता गंभीर पाऊल उचलेल आणि याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा वायको यांनी दिलाय.
एआयएडीएमकेचे राज्य सभा खासदार वायको यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून 'द फॅमिली मॅन सिझन २' ही वेब मालिकेचे प्रसारण थांबवावे अथवा तीव्र आंदोलन करुन असा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या पत्रात लिहिलंय, ''तमिळ इलमच्या योध्यांनी केलेले बलिदान चुकीच्या पध्दतीने दहशतवादी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झालाय. तमिळ बोलणारी अभिनेत्री सामंथा हिला दहशतवादी म्हणून दाखवण्यात आले असून तिचे पाकिस्तानी अतेरेक्यांशी संबंध दाखवण्यात आले आहेत. ही गोष्ट तमिळ लोकांची भावना दुखावणारे आहे आणि तमिळ संस्कती व समुदायाला बदनाम करणारे आहे. तामिळनाडूतील जनतेला हे पसंत पडलेले नाही व त्यांनी याच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.''