मुंबई- बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी आपल्या शूटिंगच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी थेट गोव्यात पोहोचले आहेत. आपल्या कुटुंबियांसोबत ते ही दिवाळी गोव्यातील सुंदर लोकेशन्सवर साजरी करतील.
''हा काळ कुटुंब आणि कामाचे मुल्य सांगणारा आहे. मी गेल्या काही महिन्यांपासून कठोर परिश्रम करीत होतो आणि आता कुटुंबाला वेळ देणे फार महत्वाचे आहे,"असे पंकज यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- वरुण धवनने शेअर केला अंडर वॉटर व्हिडीओ
मिर्झापूरच्या दोन्ही सिझनमध्ये पंकज त्रिपाठी यांनी साकारलेल्या कालिन भैय्याच्या भूमिकेने त्यांना लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचवले आहे. मिर्झापूर २ ला उत्तम प्रतिसाद मिळा आहे. याच्या तिसऱ्या भागाचीही प्रतीक्षा प्रेक्षक करीत आहेत. मिर्झापूर२ नंतर लगेचच त्यांचा 'लुडो' हा चित्रपट रिलीज झालाय. यातीलही त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिलाय.
हेही वाचा -'सूरज पे मंगल भारी' सिनेमा रचणार इतिहास - दिलजीत दोसंज
अनुराग बसू यांनी 'लुडो' चित्रपटाची निर्मीती केली आहे. अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. १२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.