मुंबईः लॉकडाऊननंतर हळूहळू बऱ्याच गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. आता सिनेमा आणि टीव्ही मलिकांच्या शूटिंगलाही सुरूवात होत आहे. अभिनेता अफताब शिवदासानी याच्या ‘पॉयजन २’ या वेब सीरिजची तयारी पूर्ण झाली आहे. याच्या शुटिंगलाही सुरूवात झालीय आफताबने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून ही माहिती चाहत्यांना कळवली आहे
इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये आफताबने सोशल डिस्टन्सिंगसह शूटिंगसाठी घालण्यात आलेल्या सर्व अटींचे पालन केले जात असल्याचे लिहिले आहे.
अॅक्शन-क्राइम थ्रिलर शो ‘पॉयजन २’ या वेब सीरिजच्या दुसर्या भागात आफताबने आदित्यसिंग राठोडची भूमिका साकारली आहे.