महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 26, 2021, 10:26 PM IST

ETV Bharat / sitara

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 'मुंबई डायरीज 26/11'चा ट्रेलर प्रदर्शित

२६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतावादी हल्ल्यात ज्यांनी लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांच्या कथा सादर करणार आहेत. या मालिकेमध्ये कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी सारखे अनेक प्रतिभावान गुणी कलाकार आहेत.

mumbai diaries 26/11
‘मुंबई डायरीज 26/11’

मुंबई -मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित अमेझॉन ओरिजनल मालिका 'मुंबई डायरीज 26/11' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात डॉक्टर्स आणि पोलिस कर्मचारी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 'साहस को सलाम' हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

निखिल अडवाणी दिग्दर्शित, निखिल अडवाणी आणि निखिल गोन्सालविस यांनी सहदिग्दर्शित केलेली 'मुंबई डायरीज 26/11' हा शो, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी यांच्यावर आधारित आहे. २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतावादी हल्ल्यात ज्यांनी लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांच्या कथा सादर करणार आहेत. या मालिकेमध्ये कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी सारखे अनेक प्रतिभावान गुणी कलाकार आहेत.

कोरोना योद्धांचा सन्मान

काय आहे कथा ?

मुंबई डायरीज 26/11 काल्पनिक कथा आहे. यात एकीकडे शहर उद्धवस्त केले परंतु दुसरीकडे आपल्या लोकांची एकजूट केली. आणि कोणत्याही संकटात मजबुतीने उभे राहण्याचा निश्चय दृढ केला. ही मालिका अशा घटनांचा लेखाजोखा घेते. ज्या सरकारी रूग्णालयात घडतात आणि रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी तसेच अविस्मरणीय आणीबाणीच्या प्रसंगाला आणि आव्हानांना उलगडून दाखवतात. 'मुंबई डायरीज 26/11' हा शो ९ सप्टेंबर रोजी २४० पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांमध्ये अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित होईल.

‘साहस को सलाम’

आदित्य ठाकरे म्हणाले, 'मुंबईचे स्पिरीट हे खरच प्रेरणादायी आहे. डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलिस, बीएमसी कामगार- हे सर्व जे खरे नायक आहेत ज्यांनी संकटाच्या काळातही शहर सुरू ठेवले. ‘साहस को सलाम’ या मालिकेद्वारे प्रत्येक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या शौर्याचा सन्मान करणाऱ्या लोकांची कथा यात मांडण्यात आली आहे.'

हेही वाचा -काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी स्फोट; 13 जण ठार, 15 जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details