सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. मनोरंजनसृष्टी तर यावर खासपणे अवलंबून असते. यावर किती फॉलोअर्स आहेत यावरून सध्या स्टार्सची पॉप्युलॅरीटी मोजली जाते. तसेच सोशल मीडियावरील फोटोजमुळे आणि व्हिडीओज मुळे अनेकांना चित्रपट, मालिका, वेब सिरीज मधून कामं मिळालीयेत. थोडक्यात हे माध्यम सध्या खूप महत्वाचं मानलं जात आणि याला दुर्लक्षित करून अजिबात चालणार नाही. यावर पोस्ट करणाऱ्या आणि लाखो फॉलोअर्स असणाऱ्यांना ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स’ म्हटलं जात आणि या माध्यमातूनही काही स्टार्स निर्माण झालेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर अभिनेत्री मिथिला पालकरचं नाव घेता येईल. आता तर डिजीटल इन्फ्लुएन्सर्स पुरस्कार सोहळे देखील भरविले जाऊ लागले आहेत.
नुकताच पहिला वहिला डिजीटल इन्फ्लुएन्सर्स पुरस्कार सोहळा पार पडला. सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असलेली आणि करोडोंच्या हृदयात स्थान मिळवलेली बबली गर्ल अभिनेत्री संस्कृती बालगुडेला नुकतंच डिजीटल इन्फ्लुएन्सर्स अवॉर्डने गौरविण्यात आलंय. त्यामध्ये संस्कृतीला ‘युथ आइकन- लोकमत डिजीटल इन्फ्लुएन्सर’ ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
पुरस्कार मिळाल्यानंतर संस्कृती म्हणाली,” मी माझ्या सोशल मीडियावर खूप विचारपूर्वक पोस्ट टाकते. आणि माझ्या पोस्टसची दखल घेतली जातेय, ह्याचीच पोचपावती डिजीटल इन्फ्लुएन्सर अवॉर्डने मला मिळाली. हा पुरस्कार मला मिळणे हे माझ्यासाठी अनपेक्षितच होतं. पण ह्या अवॉर्डच्या परीक्षकांना आणि लोकमत समूहाला मी या पुरस्कारासठी पात्र वाटले, ह्याबद्दल मला आनंद वाटतोय.“