तेलुगू आणि तामिळ चित्रपटांतील एक मोठे नाव म्हणजे सामंथा अक्केनेनी. तिने आपल्या सशक्त अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवली असून, अनेक पुरस्कारांनी गौरविलेली ही अभिनेत्री आता वेब-पदार्पण करण्यास सज्ज आहे. तिची महत्वपूर्ण भूमिका असलेली वेब सिरीज ‘द फॅमिली मॅन - २’ प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. सामंथा अक्केनेनी तमिळ आणि तेलुगू चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रस्थापित अभिनेत्री आहे. आपली सुंदरता, उत्कृष्ट अभिनय कौशल्य, निर्दोष स्क्रीन प्रेजेन्स आणि अतुलनीय बहुमुखी प्रतिभा यामुळे तिने दक्षिणेत प्रत्येकाची मने जिंकली आहेत. नव्या सीझनमध्ये श्रीकांत तिवारीचा सूड घेऊ इच्छिणाऱ्या राजीची भूमिका साकारणारी सामंथा अक्किनेनी बद्दल जाणून घेऊया.
सामंथा अक्किनेनी हे एक मेथड ॲक्ट्रेस असून ‘राजी’च्या व्यक्तिरेखेला समजण्यासाठी आणि ती प्रामाणिकपणे आपल्यात उतरवण्यासाठी, तिने खूप रिसर्च केला. तिने तीन दिवस स्वत:ला खोलीत बंद करून घेतले आणि राजी च्या व्यक्तिरेखेत मिसळण्यासाठी अनेक माहितीपट पाहिले.
थ्रिलर-ॲक्शन चित्रपट-सिरीज साठी शारीरिक फुर्तीला महत्व असते. याची जाणीव असल्यामुळे सामंथाने कठोर फिजिकल ट्रेनिंग घेतले. सामंथाने ‘राजी’च्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी तीव्र शारीरिक प्रशिक्षण घेतले आहे. आपल्या शारीरिक ट्रांसफॉर्मेशनमधून भूमिकेत जिवंतपणा आणला आहे. तिने प्रत्येक दिवशी कित्येक तास फिजिकल ट्रेनिंग घेतले आहे आणि या सिरीजमधील या भूमिकेसाठी खरोखरच आपले रक्त आटवले असून घाम गाळला आहे.
सामंथा अक्किनेनीचे ‘द फॅमिली मॅन - २’ मधून वेब-पदार्पण! उत्तम अभिनेता नेहमीच भूमिकेच्या तयारीसाठी होमवर्क करीत असतो. सामंथा सुद्धा त्याच पठडीतील असून तिच्यात नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे तसेच भूमिकेला १००% न्याय देण्यासाठी मेहनत घेण्यासाठी तयार असते. ‘द फॅमिली मॅन’मधील नव्या सीजनमध्ये समंथा सादर करत असलेल्या व्यक्तिरेखेचे नाव राजी आहे. ती श्रीकांतची प्रतिद्वंद्वी असून एका गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करते. आपल्या भूमिकेला यथासंभव आणि वास्तववादी बनविण्यासाठी तिने एका खऱ्याखुऱ्या गारमेंट फॅक्टरीमध्ये शिवणकला करण्याचे प्रशिक्षण घेतले असून आपली भूमिका उत्तमरीत्या निभावण्यासाठी तिथल्या कारागिरांची मदत देखील घेतली.
सामंथा अक्किनेनी ओटीटीवर डेब्यू करत आहे. साहजिकच आपले पदार्पण धमाकेदार करण्यासाठी तिने ॲक्शन सीन्समध्ये जान ओतली आहे. ‘द फॅमिली मॅन’मधील सामंथाच्या डिजिटल पदार्पणात ती पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे. ती पहिल्यांदाच नॉन-ग्लॅमर भूमिकेत दिसणार असून या सिरीजमध्ये ती हार्डकोर ॲक्शन स्टंट करताना दिसणार आहे आणि स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि आपल्या शत्रूशी लढण्यासाठी कठोर पाउले उचलताना दिसणार आहे. सामंथाच्या अभिनय कारकीर्दीत प्रथमच ती बंदूक हाताळताना दिसणार आहे.
फिल्म जगतात वावरतानाही सामंथाचा वास्तव आयुष्यातील मानवतावादी दृष्टीकोन वाखाणण्याजोगा आहे. आपली सामाजिक बांधिलकी ओळखून तिने एका एनजीओ ची स्थापना केली असून ही स्वयंसेवी संस्था स्त्रिया आणि लहान मुलांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. ती आपली संस्था चालवण्यासोबतच स्त्रिया आणि मुलांच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या अन्य स्वयंसेवी संस्थांना देखील मदत करते. यासोबतच, रस्त्यावरील भटक्या जनावरांसाठी काम करणाऱ्या एनजीओंना देखील सहकार्य करते. सामंथाचा मानवतेवर विश्वास असून समाजाला उत्तम बनवण्यासाठी ती नेहमीच तत्पर असते.
अमेझॉन प्राईम व्हिडिओवर ४ जूनपासून 'द फॅमिली मॅन' च्या नव्या सीजनमध्ये समन्था अक्किनेनीचा आणि अर्थातच मनोज बाजपेयीचा दमदार अभिनय बघायला मिळणार आहे.
हेही वाचा - कोविड नियम उल्लंघनासाठी टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी वर गुन्हा दाखल