महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'आई माझी काळुबाई' मालिकेतील आर्यांच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री 'प्राजक्ता गायकवाड' - actress prajakta gaikwad

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता लवकरच सोनी मराठीवरील 'आई माझी काळुबाई' या मालिकेत दिसणार आहे.

प्राजक्ता गायकवाड
प्राजक्ता गायकवाड

By

Published : Jul 30, 2020, 9:51 AM IST

मुंबई - 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता नव्या अंदाजात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. प्राजक्ता आता लवकरच सोनी मराठीवरील 'आई माझी काळुबाई' या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती आर्या नावाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.

'आई माझी काळुबाई' ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. नुकताच त्याचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये ती आर्या नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. मालिकेत आर्याच्या भक्तीची आणि काळूबाईच्या शक्तीची गोष्ट असल्याचं कळतयं.

आर्या म्हणजेच अभिनेत्री 'प्राजक्ता गायकवाड' हा चेहरा आता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या आधी प्राजक्ता गायकवाड हिला ऐतिहासिक भूमिकेमधून प्रेक्षकांनी पाहिलं आहे. पण एका कॉलेजमधल्या तरुणीची भूमिका पहिल्यांदाच ती करत आहे. या भूमिकेसाठी तिने थोडे वजन कमी केलं आहे. इतकंच नाही तर स्वतःची स्टाईल आणि लूक सुद्धा प्राजक्ताने या भूमिकेसाठी बदलेला आहे.

'आई माझी काळुबाई' या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. प्राजक्ताला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी तिचा चाहतावर्ग देखील उत्सुक आहे. प्राजक्ता पहिल्यांदाच आपल्या वयाची भूमिका साकारत आहे. आर्याचं एक पाऊल कशाप्रकारे तिचं आयुष्य बदलेल, तिच्या मदतीला काळुबाई कशी येईल हे सर्व पाहणं खूप मनोरंजक असणार आहे. आता आर्याच्या भक्तीची, काळुबाईच्या शक्तीची' ही गोष्ट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details