अभिनेत्री पूजा कातुर्डे हिला आपण ‘अहिल्याबाई होळकर’ या मालिकेमुळे ओळखतो. तिने हिंदी मालिका ‘भाकरवाडी’ मध्ये सुद्धा भूमिका केली होती. अलिकडे पार पडलेल्या व्हॅलेंटाईन डेला ती कोणत्या डेटवर होती याबद्दल तिला विचारण्यात आले होते. कारण सर्वसाधारणपणे लोकांच्या मते हा एक प्रेम दिवस असून त्यादिवशी आपल्या प्रेमाच्या व्यक्तींसोबत तो घालवावा असा प्रघात आहे.
आपल्याकडेही व्हॅलेन्टाईन्स डे जोरात साजरा केला जातो. प्रत्येकजण व्हॅलेन्टाईन्स डे ला खास व्यक्ती सोबत वेळ घालवतो, त्याला स्पेशल गिफ्ट देतो पण अभिनेत्री पूजा कातुर्डेन यावेळी व्हॅलेंटाईन डेचं स्वतःलाच गिफ्ट दिलं. पूजानं डॉग कॅफे मध्ये जाऊन व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला.